कुशाग्र बुध्दी साठी.

· Uncategorized
Authors

Forget ForgettingCategory: Education | Tags: memory intellectual performance succes
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशावेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.

तीन स्टेप प्रोग्रॅम:
पहिली पायरी: ज्ञान ग्रहण करण्यासाठी शरीर पाच ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने उपयोग करते. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशा पाच इंद्रियांना पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्या इंद्रियांमुळे मेंदू पर्यंत ज्ञान संवेदना पोचविण्याचे कार्य शरीर सहज करू शकते. हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी ही पाचही इंद्रिये स्वच्छ, तंदुरुस्त व त्यांच्या माध्यमाने संवेदना वहन करण्यासाठी असलेल्या नाड्या(Nerves) योग्य प्रकारे स्निग्धता युक्त (properly lubricated) असणे आवश्यक आहे. सर्दी झाली की वास येत नाही हे अगदी नेहमीच्या बघण्यातले उदाहरण. म्हणजे त्या इंद्रियामधे निर्माण झालेल्या दोषामुळे वासाची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. स्निग्धता इंद्रियांना किती आवश्यक आहे हे समजण्या साठी एक वाक्प्रचार आपण लहान पणा पासून ऐकत आलो आहोत, “डोळ्यात तेल घालून पहा, किंवा डोळ्यात तेल घलून लक्ष दे” म्हणजेच ज्ञानेंद्रियांची शक्ती किंवा कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी तेल किंवा तुपासारखा स्निग्ध पदार्थ किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदात तुपाच्या गुणधर्मां विषयी फार सुंदर वर्णन केले आहे, ते असे:
“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशराचे वस्त्रगाळ चूर्ण शास्रशुध्द विधीने मूर्छित केलेल्या गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. अभ्यासातून वेळ काढणे कठीण होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस तरी हे तूप नाकात जरूर टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे. मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती चोख राहते व त्यामधे काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते. जपान मधील निहॉन विद्यापिठात शास्त्रज्ञ हिरोशी साहितो ह्यांनी बौध्दिक विकासासाठी व स्मरणशक्ती वाढविण्या साठी केशराच्या उपयुक्ततेवर आपले संशोधन प्रसिध्द केले आहे. आयुर्वेदानुसार गायीचे तूप व केशर असलेले “क्लेव्हरिन नेझल ड्रॉप्स” नावाचे उत्पादन बाजारात मिळते.

दुसरी पायरी: ज्ञान योग्य प्रकारे साठवण्या करिता आवश्यक अशी रचना मेंदूच्या पेशींमध्ये घडवून आणण्याचे कार्य ह्या मुळे होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, अश्वगंधा सारख्या वनस्पतींमुळे मेंदूच्या पेशींमधील प्रथिनांचे संहनन सुधारते असे शास्त्रीय प्रयोगां मधे आढळून आले आहे. वाचनालयात नवीन पुस्तकांची भर पडली तर कपाटांची संख्या वाढवावी लागते त्याच प्रमाणे अभ्यास वाढू लागला की मेंदूच्या क्षमते मधे वाढ करावी लागते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक सर्व औषधे ह्याच प्रकारे कार्य करतात. ह्या औषधांचा उपयोग होण्याची सुरुवात साधारणतः १५ दिवसांत होते. हा फरक थर्मोमीटर ने ताप मोजण्या इतका सहज मोजता येत नही हे खरे पण मेंदूच्या क्षमते मधे वाढ कशी होते हे देश-विदेशी झालेल्या असंख्य प्रयोगांमधे निर्विवाद पणे सिद्ध झाले आहे. शिवाय दीर्घकाळ पोटात घेऊन काही दुष्परिणाम होत नाही असे अभ्यासकांचे ठाम मत आहे. ह्या वनस्पतींचे इतर अनेक गुण आहेत. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण सुधारते, रोग-प्रतिकार शक्ती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते, कॅल्शियमची झीज भरून निघते, स्टॅमिना वाढतो, जखमा लवकर भरून निघतात, केसांमधील मेलॅनिन वाढते त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन घेतांना मात्र त्यामधील घटकांचे प्रमाण योग्य आहे ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात घटक असण्यामुळे अपेक्षित गुण ठराविक कालावधी मधे मिळू शकत नाही. मुलांसाठी उत्पादन घेतांना चवीचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या सर्व वनस्पती चांगल्याच कडू असतात त्यामुळे मुले नियमित पणे घेतील की नाही? नियमित पणे घेण्यासठी आवडीची चव आणि स्वाद असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तोंड वाकडे करीत कसेतरी घशाखाली ढकललेल्या औषधाचा उपयोग जेमतेमच होईल. मुलाने आपणहून मागणी करावी अशा छान छान चवींची उत्पादने आता सहज मिळू लागली आहेत. बाजारात “क्लेव्हरॉल” नावाने एक चॉकलेट स्वाद असलेले दुग्धपेय तयार मिळते. दिवसातून एक वेळा कपभर दुधातून हे पेय घेणे पुरेसे होते .

सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी: केलेला अभ्यास बरोबर योग्य वेळी आठवणे ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. स्मरणशक्तीची यंत्रणा मेंदूच्या विशिष्ट भागातून (हिपोकॅम्पस) नियंत्रित केली जाते. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नाकाच्याच मार्गाचा उपयोग होतो. फीट आल्यावर कांदा फोडून नाकाजवऴ धरतात व त्याच्या उग्र वासाने बेशुध्द अवस्थेतून झटकन शुध्द येते. विशिष्ट वास घ्राणेंद्रिया द्वारे घेण्यामुळे मेंदूतील स्मरणयंत्रणा कार्यरत होते. ह्या विषयी जर्मनी मधे काही संशोधकांनी प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या एका समूहाला एक चाचणी प्रश्नसंच देऊन एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. झोपेत असतांना त्या खोलीत विशिष्ट सुगंधाची रात्री ४/५ वेळा फवारणी केली. त्या त्या वेळी मेंदूचा एफ् एम् आर् आय् (fMRI) स्कॅन घेतला. तेव्हां मेंदूतील हिपोकॅम्पस ची क्रिया अधिकच गतिमान होते असे लक्षात आले. दुसरा दिवस उजाडल्या नंतर त्यांची परीक्षा घेतली त्यावेळी त्यांना ९७ % उत्तरे अचूक सांगता आली. ज्या खोलीत अशी फवारणी केली नव्हती त्यांची फक्त ८४ % उत्तरे अचूक आली. ह्या वरून आपल्याला लक्षात येते की विशिष्ट वासामुळे मेंदूतील स्मरण शक्ती अधिक कार्यरत होते. ह्या संशोधनावर आधारित वेखंड, जटामांसी सरख्या बुध्दीवर्धक आणि सुगंधी वनस्पतीं पासून एक औषधी अगरबत्ती तयार केली. अभ्यास करतांना व रात्री झोपतांना खोलीत ही अगरबत्ती लावावी. हा उपाय करण्याने अभ्यास केलेला विषय मेंदूतील स्मरणयंत्रणेमध्ये पक्का बसतो व योग्य वेळी आठवण करून देण्यासाठी मदत करतो. तज्ञांच्या मर्गदर्शनाखाली “क्लेव्हरोमा” नावाने ही अभिनव अगरबत्ती तयार केली आहे व नव्यानेच बाजारात उपलब्ध केली आहे.

देवाची भक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार: देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे समजणे आपल्याला नक्कीच आवडेल. कॉर्टिझॉल नामक एक द्रव-पदार्थ (हॉर्मोन) भीती मुळे शरीरात निर्माण होतो आणि जेवढा अधिक कॉर्टिझॉल निर्माण होईल तेवढा तो मेंदूच्या पेशींना मारक किंवा घातक असतो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिध्द झाले आहे. लहान मुलाला उंच फेकल्यावर तो हसतो कारण त्याला खात्री असते की आपल्याला वरती फेकणारा जो कोण आहे तो खाली पडू देणार नाही, आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतपणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो. घरातून बाहेर प्रवासाला जातांना देवाला आणि वडील माणसांना नमस्कार करण्यामागे हाच उद्देश होता. पूर्वी चांगले रस्ते, सुरक्षित वाहाने नव्हती. प्रवासासाठी बैलगाडी किंवा घोडे वपरले जात. कधीकधी तर एका गावाहून दुसरे गाव गाठण्यासाठी पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय पाऊस, वादळ, खान-पान, जंगलातील वन्यप्राणी अशा अनेक संकटांचा सामना करण्याचे धैर्य फक्त देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळेच मिळू शकते. संकट प्रसंगी तातडीचा नेमका आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या एकाच गोष्टीमुळे शक्य होते. त्यामुळे येणारे संकट काही टळणार नाही, पण अशा संकट प्रसंगी सारासार विचार करण्यासठी बौध्दिक क्षमता आणि मानसिक धैर्य संतुलित राहण्यस नक्कीच मदत होते. पूर्वी संतोषी मातेविषयी निनावी पोस्टकार्ड येत असत. त्यात असलेला मजकूर जसाच्या तसा लिहून १६ पत्ते टाकून पाठविण्यास सांगितले असायचे. हल्ली तसा प्रकार ईमेलच्या माध्यमाने चालतो. असे न केल्यास आजार, मृत्यू, नोकरी जाणे अशी भीती उत्पन्न केली जाते. केल्यामुळे काही खास फळ मिळत नाही हे सर्वांना माहिती असून देखिल अशी पत्र किंवा ईमेल ९९% लोक फॉरवर्ड करतातच कारण ‘भीती’. असे केल्याने विशेष नुकसान तर होत नाही, झाला तर फायदाच होईल. त्यामुळे भीती पसून उत्पन्न होणारा कॉर्टिझॉलचा मेंदूवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येतो. केवळ अंधश्रध्देचा भाग न मानता त्यातील शास्त्रीयता पण समजून घेणे योग्य ठरेल.

नियमित व्यायामाचे महत्त्व: कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.

बुध्दीचा व्यायाम: नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’. सतत काही काळ एका मंद ज्योतीकडे पापण्या न हलवता एकाग्रतेने बघण्याची सवय (त्राटक) करण्याने एकाग्रता (कॉन्सेंट्रेशन) वाढते, चित्त आणि दृष्टी पण सुधारते.
आहारा बद्दल थोडेसे: मनुष्य शरीराची रचना घडवतांना निर्मात्याने फक्त शाकाहाराच्या पचनासाठी योग्य अशी यंत्रणा घडवली आहे. त्यामुळे ज्यांना मांसाहाराची आवड असेल त्यांनी आठवड्यातून एक वेळा पेक्षा जास्त मांसाहार करू नये. आयुर्वेदात पंचखाद्य नावाचा एक चविष्ट पदार्थ वर्णन केला आहे. खारीक, खजूर, खोबरं, खसखस आणि खडीसाखर अशा ‘ख’ ने सुरुवात असलेल्या पाच गोष्टी एकत्र करून झकास चवीचा हा पदार्थ मधल्यासुटी साठी फार आवडीचा मेनू होऊ शकतो. हा नुसता ‘सुका-मेवा’ नव्हे तर खरोखर ‘बौध्दिक-मेवाच’ आहे. वफर्स, वडा-पाव किंवा मैद्याच्या बिस्किटांपेक्षा बौध्दिक-मेवा एक आवडीचा मेनू होईल आणि त्यापासून अनेक फायदे पण होतील. ह्या लिखाणात दिलेल्या सर्व उत्पदनांमधील घटक, संकल्पना व उपचार पध्दती इ. माहीती बद्दल प्रस्थापित शास्त्रीय व वैद्यकीय नियतकालिकांमधून ठोस संदर्भ उपलब्ध मिळतात, ह्यात काल्पनिक किंवा करमणुकीचा भाग किंचितही नाही.

2 Comments

Comments RSS
 1. भूलना भूल जाओगे
  Forget Forgetting
  यह विश्व की प्रथम एवं एक मात्र हिन्दी निमोनिक्स की पुस्तक है। लेखक एन एल श्रमण ने अपने पचास वर्षों के अनुभवों से इसकी रचना की है। इस पुस्तक को सम्पादित करने में दस वर्षों से अधिक समय लगा है। इस पुस्तक की विषय वस्तु चार वर्ष या अधिक आयु के व्यक्तियों द्वारा याद की जा सकती है। यह पुस्तक न केवल इक्यावन से अधिक विषयों को याद करने का मार्गदर्शन करती है अपितु उससे सम्बंधित तकनीकियों की जानकारी भी देती है। यह पुस्तक स्मरण शक्ति से सम्बंधित तमाम मिथकों को तोड़ती है। इस पुस्तक की दृष्टि में स्मरणशक्ति कोई दैवीय वरदान नहीं अपितु इसे थोड़े से प्रयास से कई गुणा बढ़ाया जा सकता है। इस पुस्तक में ऐसी जानकारियाँ दी गयी है जो इस पुस्तक के अतिरिक्त अन्यत्र शायद ही कहीं उपलब्ध हो सकें। एक बार जब आप इस पुस्तक को पढ़ लेंगे तो आप को इस बात का पछ्तावा अवश्य हो सकता है कि यह पुस्तक आपको काफी पहले क्यों पढ़ने को नहीं मिली। इस पुस्तक को पढ़ने से आप अथाह आत्मविश्वास प्राप्त करेंगे, परीक्षा का नाम सुनकर आपका चेहरा खिल उठेगा, आपकी कमज़ोरियाँ खूबियों में बदल जायेंगी, ख्याति बढ़ेगी व आपकी जिन्दगी एकदम बदल जायेगी, आपकी अवस्था चाहे कुछ भी हो। यह पुस्तक न केवल छात्रों के लिये अपितु हर आयु वर्ग के लिये अत्यंत उपयोगी है।

  इस पुस्तक की विषय वस्तु में 51 से अधिक विषयों जैसे नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, बीज गणित, रेखा गणित, ठोस ज्यामिति, ज्यामिति, भौतिक विज्ञान, रसायन विज्ञान, हिन्दी अँग्रेज़ी भाषा व व्याकरण, खगोल विज्ञान, कृषि, वनस्पति शास्त्र, सामान्य ज्ञान, कम्प्यूटर विज्ञान, स्मृति शास्त्र, वेग गणित, इलेक्ट्रॉनिक्स्, मीट्रिक प्रणाली वाणिज्य, अर्थशास्त्र व देश विदेश की जानकारी आदि के साथ-2 अन्य बहुमूल्य जानकारियाँ दी गयी हैं। इसकी विषय वस्तु को चार वर्ष या इससे अधिक की आयु का कोई भी व्यक्ति स्मरण कर सकता है।

  About the Author:

  मेमोरी गुरु दुनिया के अग्रणी स्मृति प्रशिक्षकों व विशेषज्ञों में एक हैं। दुनियां में सबसे अधिक पढ़ा जाने वाले ज्ञान के भंडार “Google Encyclopedia”, के पुरस्कृत लेखक हैं । उन्होंने स्मृति कला में स्कूल, कालेजों, विश्वविद्यालयों, क्लबों, संस्थाओं, कल्याणकारी संगठनों में व्यक्तिगत रूप से उपस्थिति दर्ज की है। मेमोरी गुरु ने अपने पचास वर्षों के अनुभव से स्मरण विधियाँ, वेग गणित, परीक्षा दर्शक, उत्प्रेरक लेख, कवितायें आदि का लेखन किया है। उनकी कृतियों की हजारों प्रतियां अंतर्जाल पर अंतरित होती रहती हैं। मेमोरी गुरु के लेख विना किसी शुल्क के सारी दुनिया के लिए उपलब्ध है। वे नोल लेखक फाउन्डेशन के सह लेखक हैं। किसी भी विषय को याद करने के लिए कविता में परिवर्तित कर देना उनकी कला हैं । आज की दुनिया में आईटी जगत में मेमोरी गुरु का नाम का इतना प्रभावी है कि हर कोई प्रशिक्षक इस नाम का प्रयोग करने लगा है।

  Preview Pages on Google Books:

  Bhoolana Bhool Jaaoge

  BHOOLANA BHOOL JAAOGE -Hindi
  Re: भूलना भूल जाओगे- Forget Forgetting (Bhoolana Bhool Jaoge)

  The Memory Book ( In Hindi): The Classic Guide to Improving Your Memory at Work, at School, and at Play. HINDI MNEMONICS written by The Memory Guru of India N L Shraman world renowned Memory trainer and Motivator
  This book has all the memory techniques that are typically taught in memory courses and other memory books. Even if they are sometimes introduced by other names, all of the techniques are variants and combinations of word-substitution link, peg, loci and phonetic (letter for number substitution) systems. The book is mostly re-hashed information that has not been presented earlier, but the writing style makes it a book worth keeping.
  The real strength of this book over others of its kind is the illustrations. They are fun to read and almost never get boring.
  It is a “Hindi Mnemonics” a better book, it’s more complete a reference and gives much more of the why of memory rather than just the how of remembering. Depending on your needs, you might like this book more, it’s got more examples on how to use the systems it introduces and is much lighter and a little less dry.
  As with every other memory book, the techniques take no time to learn and effort, but work very well within a hour . For a book on memory techniques, this book doesn’t disappoint.
  4 colour Hard Boud Library Edition.

  Talk to Guru Ji : +91-9984420572
  Ask question: nlshraman@yahoo.co.in

  Examples:

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

 1. Knol Author Foundation-KAF
 2. The Memory Guru of India- Research &News
 3. सच्ची कविताएं- भारत के स्मृति गुरु व कवि प्रो एन एल श्रमण
 4. हिन्दी नॉल लेखक फाउंडेशन-Hindi Knol Author Foundation
 5. भारत के स्मृति गुरू-स्मृति के चमत्कार -भाग दो
 6. The Memory Guru of India- A B C of Memory Part IInd
 7. The Memory Guru of India: Periodic Table(आवर्त सारणी)
 8. Memory Guru Quotes
 9. प्रो एन एल श्रमण -मेमोरी गुरु आफ इंडिया के उत्प्रेरक लेख
 10. How to spell (U K Eng ) : The Memory Guru of India
 11. भारत के स्मृति गुरू- स्मृति के चमत्कार
 12. Memory Guru ways to improve your English- THE MEMORY GURU OF INDIA
 13. THE MEMORY GURU OF INDIA-Memory Aid
 14. The Memory Guru of India-1000 Ways to improve memory
 15. THE MEMORY GURU OF INDIA -MEMORY INTRO
 16. विद्या -भारत के स्मृति गुरू प्रो एन एल श्रमण
 17. The Memory Guru of India- Learn Urdu in 2 Days
 18. The Memory Guru of India- Rules of Memory
 19. स्मरण शक्ति कैसे बढ़ायें- भारत के स्मृति गुरू
 20. દિ મેમોરી ગૂરૂ આફ ઇન્ડિયા (The Memory Guru of India)
 21. The Memory Guru of India(عوامل النسيان و مهارات تحسين الذاكرة
 22. The Memory Guru of India- Competitions
 23. THE MEMORY GURU OF INDIA-ZEN MEMORY
 24. THE MEMORY GURU OF INDIA-LEARNING
 25. The Memory Guru of India- A B C of Memory Part I
 26. THE MEMORY GURU OF INDIA-For Aged
 27. THE MEMORY GURU OF INDIA-EXAM TENSION
 28. Medications -The Memory Guru of India
 29. THE MEMORY GURU OF INDIA-SPEED MATH
 30. THE MEMORY GURU OF INDIA-Face Recognition
 31. THE MEMORY GURU OF INDIA-Calandar
 32. THE MEMORY GURU OF INDIA-SPELLINGS
%d bloggers like this: